Jump to content

Help:माहितीपुस्तिका

From Wikimedia Incubator
This page is a translated version of the page Help:Manual and the translation is 81% complete.
Outdated translations are marked like this.

या पानात, विकिमिडिया ज्यात, त्याचा स्वतःचा विकि नाही,अश्या भाषेत सुरू करण्यास उत्सुक व्यक्तिंसाठी एक माहितीपत्रक आहे.सध्या अस्तित्वात असणाऱ्या विकिंवर एक नजर टाकण्यास Special:SiteMatrix हे बघा (लाल दुवे अस्तित्वात नसणारे विकि दाखवितात).

पायरी १:आवश्यकता

विकिमिडिया अश्या कोणत्याही विकिचे यजमानत्व स्वीकारीत नाही ज्याचे भाषेस किंवा संवादमाध्यमास वैध आयएसओ ६३९ संकेत नाही,किंवा ज्या भाषेचे लिखाण किंवा रुढलेखन हे सामान्यरितीने स्वीकारल्या किंवा वापरल्या जात नाही.जर आपणास वैयक्तिक प्रकल्प सुरु करावयाचा असेल तर,विकियावर इन्क्युबेटर प्लस हे बघा.

पसंतीक्रम

नोंदणी करा व पसंतीक्रम बदला

जर आपण सनोंद-प्रवेशित नसाल तर,कृपया सनोंद-प्रवेश करा किंवा खाते तयार करा. याने सहयोगी योगदानकर्त्यांचा मागोवा घेण्यास सोपे होईल.

मग, Special:पसंतीक्रम येथे जा व (१)आपली आंतरपृष्ठ(इंटरफेस) भाषा बदला व 'चाचणी विकिचे' सेटींग्ज बदला:

  • प्रकल्पही बदला (3), उदाहरणार्थ Wikipedia साठी Wp/xx
  • भाषा संकेत (4),त्यामध्ये "xx" एवजी भाषासंकेत टाका Wp/xx

पायरी २:विकि सुरू करणे

  • जर, आपली भाषा निकषात बसते काय याची आपणास शंका असेल तर,आपण Incubator:Requests for starting a test येथे विचारु शकता.
    जर आपण नमूद केलेली भाषा वैध असेल तर,ती वगळली जाऊ शकते.जर आपली भाषा वैध असेल तर, त्याचा आशय हा राखल्या जाईल व तेथील सर्व काम हे एकदा नविन विकि तयार झाला कि त्यावर हलविल्या जाईल.
  • खालील पेटीत,"xyz" ला आपल्या भाषेच्या संकेताने पुनर्स्थापित करा.आयएसओ ६३९-१ संकेत वापरा,तो अस्तित्वात नसेल तर आयएसओ ६३९-३ संकेत वापरा.
  • "Wp" (Wikipedia)हे ही पुनर्स्थापित करा. जर तो इतर प्रकल्प असेल तर ("Wt" = Wiktionary, "Wn" = Wikinews, "Wb" = Wikibooks, "Wq" = "Wikiquote", "Wy" = Wikivoyage) .

वर असलेल्या 'निर्माण करा' कळीवर टिचका व संपादन आवेदनात,"language name in English" ला आपल्या भाषेच्या इंग्रजी नावाने पुनर्स्थापित करा.अधिक माहिती चाचणी भाषेची स्थिती येथे मिळेल. मग पान 'जतन' करा.

  • आपण नुकत्याच निर्माण केलेल्या पानात दिलेले निर्देश अनुसरा.आपणास Project/code/Main_Pageया शीर्षकाचे मुखपृष्ठ निर्माण करण्याबद्दल सांगीतले जाईल.
  • आपण त्या विकिस Incubator:Wikis येथील यादीत टाकु शकता.

पायरी ३:विनंती सादर करणे

मेटावर विनंती केल्याशिवायही आपण येथे इन्क्युबेटरवर 'चाचणी विकि' सुरू करु शकता.परंतु, तश्या विनंतीशिवाय आपणास 'आपला स्वतःचा विकि' मिळणार नाही.

  • आपल्या खात्याचे विलीनिकरण करण्याची शिफारस करण्यात येते ज्याने, मेटाविकिसह आपण सर्व विकित सनोंद-प्रवेशित होउ शकता.
  • विनंती करणाऱ्यांसाठी माहितीपत्रक येथे दिलेल्या सूचनांचे पालन करा.
  • ते अद्यतन करा Wx/xyz माहितीपान नेबदलुन ही प्राचले "meta" | meta = yes
  • आम्ही आधीच सांगीतले आहे,विकिमिडिया उप-अधिक्षेत्र(सब-डोमेन) मिळविण्यासाठीची नीती ही, येथे 'चाचणी प्रकल्प' सुरू करण्यापेक्षा अधिक कठोर आहे.नीती काळजीपूर्वक वाचा.
    • जर 'चाचणी प्रकल्प' हा औपचारिक आवश्यकता पूर्ण करीत असेल तर,त्यास पात्र असण्यास पडताळला("verified to be eligible") असा शेरा देण्यात येईल.जर अश्या विनंतीस, पुष्कळ कालावधी लोटुनही असा शेरा मिळाला नाही तर, एखादी आवश्यक असणारी गोष्ट गहाळ आहे असे समजावे.

पायरी ४: इन्क्युबेटरवर

  • आशयकाम ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे.लेख लिहा व त्याचे अनुरक्षण(मेंटेन) करा.
  • आपल्या विकिच्या मंजूरीस कधीकधी अधिक कालावधी लागू शकतो.निरुत्साही होऊ नका.
  • आपण आपल्या 'चाचणी विकि'साठी, त्याची देखभाल करण्यास, चाचणी विकिचे प्रशासकपद देण्याची विनंती करु शकता.
  • भाषा समिती चा कोणताही सदस्य आपल्या 'चाचणी विकि'च्या मंजूरीसाठी प्रस्ताव देऊ शकतो.जर तसे न झाल्यास, व आपणास वाटते कि आपला 'चाचणी विकि' हा सर्व आवश्यकता पूर्ण करीत आहे तर,आपण त्याचे मंजूरीचा प्रस्ताव भाषा समितीच्या सदस्यांचे चर्चा पानावर देऊ शकता..

मूळ मार्गदर्शक तत्त्वे

हे काही नियम आहेत जे सर्व विकिमिडिया प्रकल्पांनी पाळावयास हवे:

  • वापरण्याच्या अटी सर्व विकिंना लागू आहेत.सर्व पाने ही Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 Unported LicenseGNU Free Documentation License या परवान्यांतर्गत हवी.कृपया हे ध्यानात घ्या,इतर ठिकाणांहून,जे या प्रकारे परवान्यांतर्गत नाहीत, लेखकाला विचारल्याशिवाय त्या मजकूराची नकल करू नका.
  • तटस्थ दृष्टीकोन(न्युटरल पॉइंट ऑफ व्ह्यू) (NPOV) ठेऊन लेखकांनी आपले लिखाण करावे.
  • रूढलेखन प्रघात - जर आपल्या भाषेस लेखनाचे किंवा स्पेलिंगचे एकाधिक प्रकार असतील तर, आपणास त्यासाठीच्या नियमांची आवश्यकता भासेल.
  • शैलीगत पद्धती - जर आपल्या भाषेस प्रमाणीकृत वैश्विक प्रकार नसेल (ज्या प्रकारे सर्व एकमेकांना समजण्यास ती बोलतात),आपणास त्यापैकी एकाची गरज पडेल किंवा भाषेचा कोणता प्रकार किंवा संवाद वापरावयास हवा ते लोकांना सांगण्यास त्याचे नियम हवेत.शिवाय,आपलेपाशी क्लिष्ट शैलीगत पद्धतीही हवी(उदाहरणार्थ,येथे बघा.)

पायरी ५: स्थानिकीकरण

त्याचे आंतरपृष्ठाचे आपल्या भाषेत स्थानिकीकरण करण्याची गरज आहे."स्थानिकीकरणात" मिडियाविकिच्या आंतरपृष्ठाच्या भाषांतराचा अंतर्भाव आहे.कोणताही विकि निर्माण करण्यापूर्वी,त्याचे भाषांतर ही त्यापैकी एक गरज आहे.आपण ते ट्रांसलेटविकिवर करु शकता. शक्यतोवर'चाचणी विकि'च्या कामासोबतच हे समांतररितीने केल्या जाते.

  1. जर आपण टांसलेटविकि.नेटशी अवगत नसाल तर, कृपया तेथील सूचनांचे पालन करा.
  2. ट्रांसलेटविकि.नेट वर"विशेष:भाषांतर" येथे जा व भाषांतर सुरू करा:

आपणास language support teamशी जुळण्यास प्रोत्साहन देण्यात येते,जेथे आपण आपल्या भाषेसंबंधी माहिती देऊ शकता(जसे,अनेकवचनाचे नियम)किंवा चाचणीची कार्यशैली.जर काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास,जसे, आंतरक्षेपन पद्धतीचा(ईनपुट मेथड्स) अभाव किंवा आपल्या भाषेतील टंक, तर समाज दालन किंवा translatewiki.net वर संपर्क करण्यास कचरु नका.

पायरी ६:जेंव्हा विकि मंजूर होईल

मंजूर झाल्यावर,भाषा समिती बगझिलावर एक गणकदोष विनंती टाकेल. मग,त्यानंतर ती साईट तयार करण्यास विकसकांची वाट बघावी लागेल.त्याच्या प्रगतीचा मागोवा आपण Incubator:Site creation log येथे घेऊ शकता.

पायरी ७:जेंव्हा विकि तयार होईल

  • थांबा!आपणास इन्क्युबेटर वरुन सर्व पाने नविन विकिवर नकलवायचे वाटत आहे,परंतु कृपया असे करु नका.
  • कोणीतरी, ती सर्व पाने त्यांच्या इतिहासासह व त्यांच्या उपसर्गासह आयात करेल.
  • After the import from the Incubator is done, you can edit everything, create new articles, invite new editors, and do other things to grow the wiki. Graduating from the Incubator is not the end; it is the beginning.

हेही पाहा