Wy/mr/औरंगाबाद

From Wikimedia Incubator
< Wy‎ | mrWy > mr > औरंगाबाद
Jump to navigation Jump to search
औरंगाबादच्या जवळच असलेला देवगिरीचा किल्ला.

औरंगाबाद हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे ठिकाण आहे. याच जिल्ह्यात वेरुळ आणि अजिंठा ही युनेस्काने मान्यता दिलेली जागतिक वारसा ठिकाणे तसेच जवळच असलेला दौलताबादचा किल्ला व घृष्णेश्वराचे मंदिर ही पर्यटकांचे आकर्षण असणारी ठिकाणे असल्याने औरंगाबाद हे कायमच पर्यटकांनी गजबजलेले शहर असते.

स्थिती[edit]

 • अक्षांश: १९° ३२', उत्तर. रेखांश: ७५° १४', पूर्व.
 • क्षेत्रफळ: १३८.५ चौ.कि.मी.
 • समुद्रसपाटीपासून ऊंची: ५१३ मीटर.

कसे याल[edit]

विमानाने[edit]

एअर इंडिया (आयसी-८८७ - प्रस्थान १५:५५) [१]दरवाजांचे शहर...

औरंगाबाद हे त्याच्या ऐतिहासिक दरवाज्यांसाठी प्रसिद्ध आहे. या शहराला तेरा दरवाजे असून ते खालीलप्रमाणे आहेत -

 • बारापुला गेट
 • भडकल दरवाजा
 • दिल्ली गेट
 • काळा दरवाजा
 • खास गेट
 • खीझर गेट
 • मकाई गेट
 • मंजू गेट
 • मेहमूद दरवाजा
 • नौबत दरवाजा
 • पैठण गेट
 • रंगीन दरवाजा
 • रोशन गेट