Template:Wy/mr/औरंगाबाद

From Wikimedia Incubator
Jump to navigation Jump to search
वेरुळचे कैलास लेणे

औरंगाबाद — हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे ठिकाण आहे. याच जिल्ह्यात वेरुळ आणि अजिंठा ही युनेस्काने मान्यता दिलेली जागतिक वारसा ठिकाणे तसेच जवळच असलेला दौलताबादचा किल्ला व घृष्णेश्वराचे मंदिर ही पर्यटकांचे आकर्षण असणारी ठिकाणे असल्याने औरंगाबाद हे कायमच पर्यटकांनी गजबजलेले शहर असते. वेरूळची बौद्ध लेणी येथील सगळ्यात जुनी लेणी आहेत. ही लेणी मुख्यत्त्वे विहार रूपाची आहेत. काही विहारांतून पूजेसाठी मूर्तीही आहेत. वेरूळमधल्या १६ व्या लेण्यातले शिवमंदिर जगातले सर्वात मोठे कोरीव शिल्प आहे. ह्या बहुमजली मंदिराची रचना कैलास पर्वताच्या धर्तीवर आहे. ते मंदिर निर्माण करायला अंदाजे २ लाख टन वजनाचा एका अखंड खडक वापरण्यात आला असून तो उघडपणे वरून खाली म्हणजे कळसाकडून पायाकडे खोदून कोरण्यात आला असला पाहिजे आणि ते प्रचंड खोदकाम/कोरीवकाम पुरे व्हायला कित्येक दशके लागली असणार. ह्या मंदिराच्या निर्मितीमागचे असामान्य शिल्पज्ञान ह्या गोष्टी हजार-दीडहजार वर्षांपूर्वी ज्या माणसांना अवगत होत्या त्यांची नावेही इतिहासात कोणी नोंदवलेली नाहीत.