Wy/mr/शेगाव

From Wikimedia Incubator
< Wy‎ | mrWy > mr > शेगाव
Jump to navigation Jump to search

बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. श्री गजानन महाराज यांचे वास्तव्य लाभलेले हे ठिकाण विदर्भातील पंढरपूर असे संबोधले जाते. महाराजांच्या समाधीस्थळावर एक भव्य मंदीर बांधले गेले असून त्याची व्यवस्था तेथील 'गजानन महाराज संस्थान' पाहते. तेथील संस्थानाच्या 'भक्त निवास' मध्ये अल्प दरात मुक्कामाची सोय आहे. तेथे ७०० खोल्यांची व्यवस्था असून, गर्दीच्या वेळेस त्याव्यतिरिक्त ५००० बिछाने देखील पुरविण्यात येतात.येथे येणाऱ्या भक्तांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या निवासाची व्यवस्था येथे आहे. याच संस्थानाने आनंद-सागर हे प्रेक्षणीय स्थळ सुमारे ३५० एकर जागेपैकी सध्या १२० एकर जागेवर निर्माण केले असून पर्यटकांमध्ये ते अत्यंत लोकप्रिय आहे.त्याच्या विस्ताराचे काम सुरु आहे.ते शेगांव-बाळापूर रस्त्यावर, शेगांवपासून सुमारे २.५ कि.मी. अंतरावर आहे. तेथे जवळच 'आनंद सागर विसावा' येथेही भक्त निवास असून तेथेही राहण्याची व भोजनाची सोय आहे.

शेगांव येथील आनंद सागरचे प्रवेशद्वार
आनंद सागर, शेगांव

या संस्थानातर्फे सेवार्थ बस सेवा,निःशुल्क महाप्रसाद, अल्पदरात भोजन व्यवस्था,विविध वैद्यकिय सेवा इत्यादी अनेक प्रकल्प राबविण्यात येतात.

शेगांव रेल्वे स्थानक मुंबई-भुसावळ-नागपूर मार्गावर आहे.शेगांवाची लोकसंख्या ३२,८२४ आहे.महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरातून शेगांवाकरीत राज्य परिवहन मंडळाच्या व खाजगी बसेस उपलब्ध असून मुंबई-नागपूर मार्गावरील सर्व प्रमुख रेल्वे गाड्या येथे थांबतात.

येथील 'कचोरी' हा खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहे.