Wy/mr/लास्को

From Wikimedia Incubator
< Wy‎ | mr
Wy > mr > लास्को
लॅस्को गुहेत चित्रित एक घोड्याचे चित्र

लास्को हे फ्रान्समधील प्रागैतिहासिक गुहाचित्रे असलेले स्थळ आहे. दोर्गोन्य विभागातील मॉंतीनॅक गावाजवळ व्हेझर नदीच्या खोऱ्यात ते वसलेले आहे. इ.स. १९७९ साली युनेस्कोने या स्थळाचा जागतिक वारसा स्थान म्हणून आपल्या यादीत समावेश केलेला आहे.

कसे याल[edit | edit source]

  • रेल्वे - कॉनडैट रेल्वेस्थानकापासून १० किलोमीटर

अधिक माहिती[edit | edit source]

शोध[edit | edit source]

१२ सप्टेंबर, इ.स. १९४० या दिवशी माल्कल रावीडट, जॅक मार्सल, जॉर्ज अॅंजल, सायमन कॉइनकस या छोट्या मुलांनी तसेच छोटे कुत्र्याचे पिलू रोबोट यांनी लॅस्को येथील गुहाचित्रांचा शोध लावला. मार्कलच्या कुत्र्याच्या पिलाबरोबर ही मुले खेळत असताना हे कुत्र्याचे पिलू एका गुहा बिळात शिरले. त्याच्या पाठोपाठ गेलेल्या या मुलांना ही गुहेतील भित्तीचित्रे आढळली.

पाहा[edit | edit source]

लॅस्को येथील गुहात चितारलेली भित्तिचित्रे ही फिकट रंगाच्या पार्श्वभूमीवर काढलेली आहेत. रंगीत चित्रांव्यतिरीक्त येथे उत्कीर्ण चित्रांचीही रेखांकने आहेत. हरीण, सिंह, बारशिंगा, रानगवा आणि प्रचंड हत्ती यांची चित्रे येथे असून ही सर्व चित्रे एकाच परिमाणात काढलेली आहेत. काळवीट, बैल, घोडे या प्राण्यांची चित्रे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. लॅस्को येथील गुहांचा शोध लागला त्यावेळी येथील चित्रे सुस्थितीत होती त्यामुळे इ.स. १९४८ साली ती प्रेक्षकांसाठी खुली करण्यात आली. परंतु रोजच्या जवळपास १२०० प्रेक्षकांच्या भेटीमुळे निर्माण होणाऱ्या कार्बन डायॉक्साईडमुळे व काही इतर कारणांनी या चित्रांतील काही रंग फिकट होऊ लागले व काही चित्रांवर हिरवी बुरशी चढू लागली त्यामुळे इ.स. १९६३ पासून ही गुहाचित्रे प्रेक्षकांना पाहण्यासाठी बंद करण्यात आली. या चित्रांचे परत संवर्धन केल्यानंतर इ.स. १९८३ साली या चित्रांच्या मूळ ठिकाणापासून २०० मीटर अंतरावरून प्रेक्षकांना पाहण्यासाठी ती परत खुली करण्यात आली.

चित्रदालन[edit | edit source]