Wy/mr/द्वारका

From Wikimedia Incubator
< Wy‎ | mr
Wy > mr > द्वारका
द्वारकेचे चित्र

द्वारका हे भारताच्या गुजरात राज्यातील प्राचीन शहर आहे.महाभारतातील अख्यायिकेप्रमाणे या शहराची स्थापना भगवान श्रीकृष्णांनीकेली. जरासंधाने कालयवनाच्या मदतीने मथुरेवर १७ वेळा आक्रमण करून यादवांचा पराभव केला.१८ व्या वेळी जरासंध व कालयवनाने मथुरेवर आक्रमण केल्यामुळे भगवान श्री कृष्ण व बलरामाने भगवान विश्वकर्मा यांचे आवाहन केले. विश्वकर्मा प्रगट झाल्यावर त्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या विनंतीवरुन समुद्रावर तरंगत्या अद्भुत द्वारकेची निर्मिती केली.ही द्वारका म्हणजे सोन्याची नौकाच होती.द्वारकेचे प्रवेशद्वार अद्भुत होते.जरासंधासारखे शत्रु द्वारकेत सहजासहजी प्रवेश करू शकणार नाहीत अशी या प्रवेशद्वाराची रचना होती.


अख्यायिकेप्रमाणे मूळ द्वारका ही बेटावर वसलेली होती व बंदर स्थान होते. बंदर अर्थव्यवस्थेमुळे आर्थिक दृष्ट्या पुढारलेले शहर म्हणून ख्याती होती. गांधारीच्या शापामुळे कृष्ण जाणून होता की एक दिवशी यादवांच्या कुलनाशाबरोबरच द्वारकेचाही नाश होईल. यादवांनी आपसात लढून आपला कुलनाश करून घेतल्यानंतर द्वारकेला समुद्राने आपल्या अंतरात समावून घेतले अशी अख्यायिका आहे.