Wy/mr/कुंभमेळा
कुंभमेळा हे एक धार्मिक आणि सांस्कृतिक पर्व आहे. कुंभमेळ्याला जगभरातून भाविक आणि पर्यटक येतात. वेगवेगळ्या आखाड्याच्या साधूंच्या मिरवणुका आणि शाही स्नान हे कुंभमेळ्याचे विशेष आकर्षण असते.
गंगा नदीकिनारी हरिद्वार, क्षिप्रा नदीकाठी उज्जैन, गोदावरी काठी नाशिक आणि गंगा आणि यमुना संगमावर प्रयागराज येथे दर चार वर्षांनी एकदा कुंभमेळा भरतो.
अलाहाबाद येथे बारा पूर्ण कुंभमेळ्यांनंतर तब्बल १४४ वर्षांनंतर महाकुंभमेळा भरतो आहे. मकरसंक्रांतीपासून ४५ दिवस प्रयागतीर्थावर (अलाहाबाद येथील त्रिवेणी संगमावर) कुंभमेळ्याच्या यात्रेचा आरंभ होत आहे. कुंभातील पहिला स्नान १४ जानेवारी रोजी मकरसंक्रांतला सुरू होणार असून २७ जानेवारी २०१३ पौष पौर्णिमा, ०६ फेब्रुवारी २०१३ एकादशी, १० फेब्रुवारी २०१३ मौनी अमावस्या, १५ फेब्रुवारी २०१३ वसंत पंचमी, १७ फेब्रुवारी २०१३ रथसप्तमी,१८ फेब्रुवारी २०१३ भीष्म एकादशी, २५ फेब्रुवारी २०१३ माघ पौर्णिमा, १० मार्च २०१३ महाशिवरात्री- विशेष शाही स्नानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर कुंभमेळ्याचा समारोप केला जाईल.
चित्रदालन
[edit | edit source]-
१०८ कुंभ मंदिर
-
मेळ्यातील एक साधू
-
साधू गुरु आणि शिष्य