Wy/mr/इल-दा-फ्रान्स

From Wikimedia Incubator
< Wy‎ | mrWy > mr > इल-दा-फ्रान्स
Jump to navigation Jump to search
इल-दा-फ्रान्स

इल-दा-फ्रान्स (फ्रेंच: Île-de-France; शब्दश: अर्थ: फ्रान्सचे बेट) हा फ्रान्स देशाच्या २२ प्रदेशांपैकी सर्वाधिक लोकसंख्येचा प्रदेश आहे. ह्या प्रदेशात मुख्यतः राजधानी पॅरिस महानगर क्षेत्राचा समावेश होतो. सुमारे १.१७ कोटी लोकसंख्या असलेला इल-दा-फ्रान्स हा युरोपातील चौथ्या क्रमांकाचा मोठा प्रशासकीय विभाग आहे (इंग्लंड, नोर्डर्‍हाईन-वेस्टफालन व बायर्न) खालोखाल. आर्थिक दृष्ट्या इल-दा-फ्रान्स जगातील चौथ्या तर युरोपातील अव्वल क्रमांकाचा धनाढ्य प्रदेश आहे.

विभाग[edit | edit source]

खालील आठ फ्रेंच विभाग इल-दा-फ्रान्स प्रदेशाच्या अखत्यारीत येतात.

वाहतूक[edit | edit source]

फ्रान्सचे आर्थिक व राजकीय इंजिन असलेला इल-दा-फ्रान्स रस्ते, रेल्वे व हवाई मार्गाने जोडला गेला आहे. चार्ल्स दि गॉल हा फ्रान्समधील सर्वात मोठा विमानतळ इल-दा-फ्रान्सच्या तीन विभागांमध्ये पसरला आहे. युरोपातील सर्वात वर्दळीचे रेल्वे स्थानक पॅरिस गार द्यु नॉर हे फ्रेंच टीजीव्ही सेवेमधील प्रमुख स्थानक आहे.

खेळ[edit | edit source]

इल-दा-फ्रान्स हे फ्रेंच क्रीडाविश्वाचे माहेरघर आहे. फ्रेंच ओपन ही मानाची ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा दरवर्षी मे महिन्यात पॅरिसमध्ये खेळवली जाते. स्ताद दा फ्रान्स हे फ्रान्सचे राष्ट्रीय फुटबॉल स्टेडियम सीन-सेंत-देनिस ह्या विभागातील सेंत-देनिस ह्या पॅरिसच्या उपनगरामध्ये स्थित आहे.