Jump to content

Wy/mr/अमरावती

From Wikimedia Incubator
< Wy | mr
Wy > mr > अमरावती

अमरावती शहराची रचना फार छान आहे. विस्तृत रस्ते आणि शहराचा विस्तीर्ण विस्तार शहराला भव्यता देतात. मुख्य चौक म्हणजे राजकमल चौक, आयर्विन चौक, श्याम चौक, राजापेठ चौक, पंचवटी चौक, अंबापेठ चौक, आणि बस स्थानकाला येथे डेपो असे म्हणतात तो डेपो चौक.

हे ऐतिहासिक शहर असल्यामुळे या शहराला तटबंदी आहे. आणि त्याला असलेले दरवाजे - अंबागेट , जवाहर गेट अशा नावाने प्रसिद्ध आहेत. जुने गाव हे तटबंदीच्या आत वसलेले असायचे. आज शहराचा विस्तार फार झाला आहे. आता महापालिकेच्या सरहद्दी बाजूच्या उपनगरांच्याही बाहेर गेल्या आहेत. वलगाव, बडनेरा आता अमरावती शहरात मोडतात. शहराचे मुख्य भाग म्हणजे अंबा पेठ, गाडगे नगर, साईनगर, श्रीकृष्ण पेठ, दस्तुर नगर, राजापेठ, सातुर्णा, कंवर नगर, रुक्मिणी नगर, यशोदा नगर, इत्यादी.

सांस्कृतिक

[edit | edit source]

अंबादेवी हे शहराचे मुख्य दैवत आहे. शहराच्या मध्यावर अंबापेठेत देवीचे पुरातन देऊळ आहे. रुक्मिणीने श्रीकृष्णाला याच मंदिरात बोलावले होते, असे म्हटले जाते. येथे श्रीकृष्णाने देवीची पूजा करून रुक्मिणीला सोबत नेले होते. मंदिराच्या जवळच एकवीरा देवीचे मंदिर आहे. त्या मंदिराच्या खाली योगाचार्य जनार्दन स्वामी यांची समाधी आहे.