Jump to content

Template:Wy/mr/होट्टल

From Wikimedia Incubator

होट्टल — हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यात देगलूरपासून ८ कि.मी. पश्चिमेला असलेले एक आडमार्गावरील ठिकाण आहे. होट्टल हे गाव चालुक्यकालीन शिल्पस्थापत्य अवशेषांचे आगारच आहे. या गावात अनेक मंदिरे चालुक्यांच्या राजवटीत बांधली गेलेली होती. त्यामध्ये सिद्धेश्वर, परमेश्वर, महादेव, सोमेश्वर, रोकबेश्वर, त्रैपुरुषदेव या मंदिरांचा समावेश होतो. यातील काही मंदिरे आजही चांगल्या स्थितीत आहेत तर काही उध्वस्त झालेली तर काही उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. एका दृष्टीने ही मंदिरनगरी म्हणून चालुक्य काळात अस्तित्वात असावी. मंदिरस्थापत्याचा अप्रतिम अविष्कार येथे पहायला मिळतो. होट्टल येथील शिल्पसंपदा फक्त मराठवाड्याचीच नव्हे तर साऱ्या महाराष्ट्राची सौभाग्यलेणी ठरावीत अशी आहे.