Jump to content

Template:Wy/mr/अहमदनगर

From Wikimedia Incubator

चांदबिबिचा महाल — अहमदनगर शहरापासून पूर्वेला दहा किलोमीटर दूर, अहमदनगर-पाथर्डी रस्त्यावर ९०० फूट उंचीच्या शाह डोंगरावर चांदबिबीचा महाल या नावाने ओळखली जाणारी एक अष्टकोनी वास्तू आहे. सुमारे साडेचारशे वर्षांपूर्वीचा हा ७० फूट उंचीचा, तीन मजली चिरेबंदी व अष्टकोनी महाल. त्याच्या जमिनीखाली एक तळमजला आहे. इमारतीच्या भिंतींना तिरप्या फटी असल्याने दिवसभर या इमारतीत सूर्याची किरणे पोचतात. सलाबतखाने इ.स. १५८० मध्ये हा तीन मजली महाल बांधला.

लोक गैरसमजुतीने या वास्तूला चांदबिबीचा महाल म्हणत असले, तरी ही दुसऱ्या सलाबतखानाची कबर आहे. हा सलाबतखान हा इसवी सनाच्या १५५५ मध्ये गादीवर आलेला चौथा निजाम, मूर्तजा याचा वजीर होता.