Wy/mr/तेर

From Wikimedia Incubator
< Wy‎ | mrWy > mr > तेर
Jump to navigation Jump to search
तेर येथील त्रिविक्रम मंदिर
तेरच्या बसस्थानकासमोरील उत्खनन केलेली जागा (३० जुलै, २०१२चे छायाचित्र)

तेर हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील एक पुरातत्त्वीय उत्खननस्थळ आहे. हे ठिकाण उस्मानाबादपासून ईशान्येला १८ किलोमीटर अंतरावर असून तेरणा नदीच्या दक्षिण काठावर वसलेले आहे. या नगराला प्राचीन काळी तगर या नावाने ओळखले जात होते.

कसे याल[edit]

काय पाहाल[edit]

  • त्रिविक्रम मंदिर - भारत सरकारच्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने हे मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. याठिकाणी माणसाच्या आकाराएवढी मोठी त्रिविक्रमाची मूर्ती आहे. त्रिविक्रम मंदिराची बांधणी चैत्यासारखी असून त्याचा काळ इ.स.चे दुसरे शतक ते इ.स.चे पाचवे शतक असा आहे. त्रिविक्रम मंदिराचा मंडप खुर, कुंभ आणि वेदिका या थरांच्या पीठावर असलेल्या स्तंभिकांनी बनलेला आहे. या स्तंभिकांवर मंदिराच्या तुळ्या आहेत. मंडपाच्या पुढच्या दोन्ही कोपर्यात वाकाटक शैलीचे स्तंभ आहेत. वेदिका आणि कक्षासनावर असलेल्या वामन स्तंभांवरील अलंकरण उल्लेखनीय आहे. वेदिका खोलगट देवकोष्ट आणि अर्धस्तंभाने अलंकृत आहे. देवकोष्ठांमध्ये गण असून अर्धस्तंभावर फुलांची नक्षी आहे. वेदिकेवरील वामनस्तंभाचे तळखडे पूर्णकुंभाचे असून त्यावरील खांब अर्धकमलतबकांनी अलंकृत केलेले आहेत.
  • उत्तरेश्वर मंदिर - हे मंदिर उत्तरेच्या ईश्वराचे म्हणजेच शंकराचे आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून त्यात गर्भगृह आणि मंडपाचा समावेश आहे. हे मंदिर विटांनी बांधलेले असून त्याच्या दरवाजाची चौकट लाकडी आहे या लाकडी चौकटीचा बुडाचा भाग नष्ट झालेला आहे. उत्तरेश्वर मंदिराच्या गर्भगृहाच्या बाह्यांगावर दिसून येणारी वास्तुवैशिष्ट्ये, द्राविड शैलीतील कूटशिखरे, शालाशिखरे आणि त्यात व्याल घटकांच्या ऐवजी मकर घटकांचा केलेला वापर, मध्यभागी चैत्यगवाक्ष असलेल्या स्तूपिकेची वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि दरवाजाच्या लाकडी चौकटीवरील शिल्पांची शैली यावरून हे मंदिर इ.स. ५५० च्या सुमारास बांधले गेलेले आहे. मंदिराच्या अधिष्ठानाच्या थरावर गर्भगृहाची भिंत असून या भिंतीवर ठराविक अंतरावर द्राविड शैलीचे सडपातळ स्तंभ आढळतात. या स्तंभाच्या मधील जागेत चैत्यगवाक्षांची नक्षी असून त्यावरील कमानीच्या खालच्या भागात मकर दाखविलेले आहेत. भिंतीच्या वर त्रिमितीयुक्त थराचे छत असून त्यावर स्तुपिकेसारखा वास्तुघटक आहे. पंचरथ प्रकारच्या या गर्भगृहावर छताच्या दोन थरात शालाशिखर व कूटशिखर वास्तुघटक आहेत. स्तुपिकेची बाह्यरेषा त्रिरथ प्रकारची असून वरचा भाग त्रिमितीयुक्त आहे.
  • संत गोरा कुंभार यांचे तेर येथील समाधी मंदिर -